Homeताज्या बातम्या

जंतर-मंतर युवा आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध; बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

बीड: जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या युवा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज, अश्रुधूर व पाण्याच्या फवार्‍यांच्या कारवाईचा निषेध करत बीडमध्ये विविध सा

तीन वर्षांनंतर चोरीची ६८ हजारांची रोकड परत; शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा; सांगलीतील धक्कादायक घटना, संशयित पत्नी व प्रियकर ताब्यात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील विकास कामे तातडीने सुरू करा; अन्यथा २ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

बीड: जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या युवा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज, अश्रुधूर व पाण्याच्या फवार्‍यांच्या कारवाईचा निषेध करत बीडमध्ये विविध सामाजिक व कामगार संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्र सरकारचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. काक्रोच पार्टीचे अभिजीत दिपके तसेच पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूंग यांनी सुरू केलेल्या उपोषणाला हजारो तरुणांचा पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून सरकार अस्वस्थ झाले असून पोलिस यंत्रणेकडून आंदोलकांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोप प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी केला.

युवा आंदोलकांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात किसान संघर्ष समिती, जनहित अभियान, ओबीसी संघर्ष समिती, राष्ट्रीय समाज पक्ष, युवक क्रांती दल, हमाल मापाडी संघटना तसेच विविध कामगार संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी प्रा. सुशीलाताई मोराळे, अमर शेख, पंडित तुपे, संगमेश्वर आंधळकर, शेरजमा पठाण, प्रा. अण्णासाहेब मतकर, अंकुश खाडे, बबन आंधळे, कॉ. इकबाल पेंटर, माजी आमदार भाई जनार्दन तुपे, बबन वडमारे, डॉ. संजय तांदळे, सुभाष लोणके, मधुकर केदार, बाजीराव ढाकणे, भाई अ.भ. लोंढे, संतराम घोडके पाटील, डॉ. डी. जी. तांदळे, वजीर शेख, बाळासाहेब पवळ, देविदास चव्हाण, शेख शफिक भाई, मौलाना आझाद विचार मंचचे रिजवान पठाण, सुग्रीव केदार, राजेंद्र सानप, मीनाक्षी देवकते, ज्योती वडमारे, विद्या राठोड, शारदा अडागळे, राजेंद्र दराडे, अनंत सारुक, दादासाहेब मुंडे, इलियास इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS