बीड: येथील सौ. केशरीबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी संसद (Student Co

बीड: येथील सौ. केशरीबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी संसद (Student Council) ची स्थापना उत्साहात करण्यात आली. महाविद्यालयातील गुणवंत व नेतृत्वगुण असलेल्या विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली असून नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे महाविद्यालयीन स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी, नेतृत्व कौशल्यांचा विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा, या उद्देशाने नियमानुसार विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली.
यामध्ये तावरे पांडुरंग यांची ‘मुख्यमंत्री’ म्हणून, तर दिव्या ससाणे (नियोजन मंत्री), श्रृती उमाप (कायदे व शिक्षा मंत्री), रुद्राक्ष बहिरवाळ (माहिती व प्रसारण मंत्री), विशाल राजंवण (रोजगार व स्वयंरोजगार मंत्री), श्रावणी दासखेडकर (कौशल्य विकास मंत्री), गितांजली शेळके (संसदीय कामकाज मंत्री) आणि ज्ञानेश्वर परदेशी (उद्योजकता विकास मंत्री) म्हणून निवड करण्यात आली. तसेच अतुल शिंदे, सुशांत शिंदे आणि शिवतेज रांजवण यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित विद्यार्थी संसद पदाधिकार्यांचे नवगण शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वंभर देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे, प्राचार्य शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कमवि उपप्राचार्य डॉ. नारायण काकडे तसेच पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS