Homeताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची दमदार कामगिरी! जबरी चोरी, घरफोडी, सोलार प्लांटवर चोरी करणारी टोळी केली जेरबंद

केज: बीड जिल्ह्यासह केज तालुक्यामध्ये सध्या चोऱ्या, घरफोडी, सोन्याचे दागिने, दरोडे, मोटारसायकल व मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अ

चकलांबा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध वाळू, गुटखा व देशी दारू जप्त, ३१.९८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
आषाढी एकादशीपूर्वीच पंढरपुरात भाविकांचा महापूर; विठ्ठल दर्शनाची रांग ८ किलोमीटरवर, प्रसादासाठी १२ लाख लाडू सज्ज!
परळीतील ’त्या’ मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून मित्रांनीच केला खूनस्थानिक गुन्हे शाखे कडून 48 तासांत आरोपी जेरबंद

केज: बीड जिल्ह्यासह केज तालुक्यामध्ये सध्या चोऱ्या, घरफोडी, सोन्याचे दागिने, दरोडे, मोटारसायकल व मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून या सर्व बाबींमुळे सर्वसाधारण नागरिक त्रस्त झाले होते. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी करत जबरी चोरी, घरफोडी तसेच सोलार प्लांटवर चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व अंमलदार हे केज पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपींचा शोध उपविभागात घेत असताना, गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, प्रकाश उर्फ गुड्ड्या काळे (रा. मोहा) याने त्याच्या मित्रासह पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने (MH 12 HF 4245) धारूर येथे रात्रीच्या वेळी जाऊन शेळ्या चोरी केल्या होत्या व त्या विक्री केल्या आहेत. तसेच दोन दिवसांपूर्वी केज येथून कॉपर (तांबे) चोरी केले असून तो ते विक्री करण्यासाठी कळंब येथे जाणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने मोहा गावाच्या दिशेने धाव घेतली. दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास मोहा रस्त्यावर संशयित स्कार्पिओ गाडीत सहा इसम आढळून आले. यात प्रकाश उर्फ गुड्ड्या शहाजी काळे, शहाजी शेषराव पवार, संतोष बारीकराव शिंदे (तिघे रा. मोहा, ता. कळंब), दिनेश नागनाथ काळे (रा. कुरने नगर, जि. धाराशिव), महेश शिवाजी पवार आणि अशोक हिम्मत शिंदे (रा. मोहा) यांचा समावेश होता. यातील दोन आरोपी पोलीस पथकास धक्का देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी धारूर तालुक्यातील आडस येथून एका इसमाला मारहाण करून १२ शेळ्या चोरी केल्याची कबुली दिली. तसेच केज तालुक्यातील कानडी माळी व मस्साजोग येथील सोलार प्लांटमधून अर्थिंग रॉड व वायर चोरी केल्याचे आणि नेकनूर हद्दीतील येळंबघाट येथे रात्रीची घरफोडी केल्याचे कबूल केले. आरोपींच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे आणि स्कार्पिओ वाहनासह तब्बल ६ लाख ७९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे: या कारवाईमुळे धारूर पोलीस ठाणे (गु.र.नं. २६८/२०२६), नेकनूर पोलीस ठाणे (गु.र.नं. २७६/२०२६) तसेच केज पोलीस ठाणे (गु.र.नं. ४६१/२०२६ आणि ३४७/२०२६) येथील विविध कलमांखालील गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस अंमलदार घोडके, जफर पठाण, दिलीप गीते, भागवत शेलार, दीपक खांडेकर, अर्जुन यादव, मुंडे, अश्विनकुमार सुरवसे आणि गणेश मराडे यांनी केली आहे.

COMMENTS