नेकनूर: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगुरू बंकटस्वामी मठ येथे भाविकांसाठी भव्य फराळाचे आयोजन करण्यात आले. अत्यंत ध

नेकनूर: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगुरू बंकटस्वामी मठ येथे भाविकांसाठी भव्य फराळाचे आयोजन करण्यात आले. अत्यंत धार्मिक व भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल-रुक्मिणींचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला नेकनूर पोलीस स्टेशनचे एपीआय साळवे, पीएसआय धायगुडे, चंद्रकांत काका शिंदे, नामदेव अण्णा काळे, पाटील आप्पा, बाजीराव काळे, रावसाहेब तात्या काळे, रामदास बाप्पा शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नेकनूरचे उपसरपंच सचिन भैय्या शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत समाजात ऐक्य, बंधुभाव आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांचे महत्त्व असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मठाचे सेवेकरी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे धार्मिक परंपरा अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली.

COMMENTS