शिर्डी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील २४ विविध विकासकामांसाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी म

शिर्डी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील २४ विविध विकासकामांसाठी ४ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या कामांना मंजुरी दिली असून, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात ही कामे मार्गी लागली आहेत.
या मंजूर निधीपैकी ३० टक्के म्हणजे १ कोटी ३० लाख ८० हजार रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती खासदार वाकचौरे यांनी दिली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २३ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार २ कोटी ३८ लाख रुपयांच्या १५ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये अकोले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भवनाच्या विस्तारीकरणासाठी, कोपरगाव तालुक्यातील धामोरी व श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे संविधान भवन उभारण्यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सांस्कृतिक भवनासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. काकडी येथील आंबेडकर स्मारकाचे सुशोभीकरण, करंजी येथील संत रविदास महाराज मंदिर सभामंडप, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण संस्था परिसरातील सभामंडप, खंदरमाळी येथील संत रोहिदास महाराज मंदिरासमोरील सभामंडप, आश्वी येथील सामाजिक सभागृहाला संरक्षक भिंत व सुशोभीकरण, निमगाव खैरी येथील संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप तसेच जळके खुर्द येथील आंबेडकरनगर दलित वस्तीतील सभामंडपासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासह राहुरी परिसरासाठीही विकासकामांचा निधी देण्यात आला आहे.

COMMENTS