श्रीगोंदा: आषाढी एकादशीचे औचित्य साधत रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात ग्रंथ दिंडी व रिंगण सोहळ्याचे अतिशय भक्तिमय वातावरणात आयोजन क

श्रीगोंदा: आषाढी एकादशीचे औचित्य साधत रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात ग्रंथ दिंडी व रिंगण सोहळ्याचे अतिशय भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, पिटर रणसिंग, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सचिन झगडे तसेच शिक्षक-शिक्षिकांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर ग्रंथ दिंडीस पुष्पहार अर्पण करून दिंडीचा थाटात प्रारंभ करण्यात आला.
महादजी शिंदे विद्यालयापासून श्री संत शेख महंमद महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या ग्रंथ दिंडीत विद्यार्थ्यांनी संतपरंपरा, वाचनाचे महत्त्व आणि ज्ञानसंवर्धनाचा संदेश देणारे आकर्षक फलक हातात घेतले होते. “ज्ञान हीच खरी शक्ती”, “वाचन संस्कृती जोपासा”, “संत विचार आत्मसात करा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी आणि विविध संतांच्या नेटक्या वेशभूषेतील विद्यार्थी या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले.
संत शेख महंमद महाराज मंदिर परिसरात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजातात वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले.
या उपक्रमाचे नियोजन व आयोजन सुनिता काकडे, माधुरी सरोदे, योगिता मुळे, मंजुश्री चोर आणि सुपेकर मॅडम यांनी केले. फलक लेखन व संदेश तयार करण्याची जबाबदारी कल्याण उल्हारे यांनी पार पाडली. आकर्षक रांगोळीची सजावट सर्व महिला शिक्षिका व ज्युनिअर विभागातील विद्यार्थिनींनी केली, तर पालखीची आकर्षक सजावट शिक्षकवृंदाने केली. विद्यार्थ्यांची वेशभूषा व रंगभूषा शरद शिरसाट व शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संदिप बिरंगळ, मोरे, राजेंद्र शिंदे, विकास लोखंडे, सुधीर साबळे, अंकुश हिंगणे आणि राजेश पोटे यांनी विशेष सहकार्य केले. मुख्याध्यापक दिलीप भुजबळ, उपमुख्याध्यापक शहाजी एकाड, पर्यवेक्षिका सुनीता काकडे, गुरुकुल प्रमुख बापू जाधव तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

COMMENTS