Homeताज्या बातम्या

नीट पेपर लीकप्रकरणी बिहार बंद दरम्यान हिंसाचार; सीवानमध्ये दगडफेकीत एसपी जखमी, तेजप्रताप यादव पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आणि पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांच

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त इंदिरा गांधी पॉलिटेक्निकमध्ये वृक्षारोपण
भिवंडीतील भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कारने तीन दुचाकींना उडवले
महावितरणच्या कोतूळ उपकेंद्राचा कारभार रामभरोसे; ‘सहाय्यक अभियंता’ पद रिक्त; वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप

नवी दिल्ली: नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आणि पोलिसांच्या लाठीचार्जविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन देशभरात तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बिहारमध्ये ‘बिहार बंद’ पुकारण्यात आला. या बंददरम्यान पाटणा आणि सीवानमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. सीवान येथे झालेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक (एसपी) गंभीर जखमी झाले आहेत.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पांगवत आहेत. दरम्यान, या आंदोलनात थेट रस्त्यावर उतरून सहभाग घेतलेले नेते तेजप्रताप यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देशभरात नीट परीक्षेतील गैरव्यवहारावरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून जागोजागी निदर्शने केली जात आहेत. बिहारमधील अनेक शहरांत बंदचा मोठा परिणाम दिसून आला असून पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS