Homeताज्या बातम्या

सौ. के.एस.के. महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

बीड  येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य टि

बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बीड येथे ‘अभंग वाणी’ भक्ती संगीताचे आयोजन
सौ. के. एस. के. महाविद्यालयात स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी; सामाजिक व शैक्षणिक कार्याला अभिवादन
सौ. के.एस.के. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण


बीड  येथील सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बीड व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर , उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविकात स्टाफ सेक्रेटरी डॉ. वंदना फटाले यांनी लोकमान्य टिळक यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना भारतीयांच्या मनात तेवत ठेवली या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वाणी पी. आर. , पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस., कार्यक्रमाधिकारी प्रा. जयंत साठे, डॉ. पल्लवी इरलापल्ले, डॉ. सय्यद इमामुद्दिन, डॉ. प्रमोद गायके आदिंसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS