Homeताज्या बातम्या

रूग्णसेवा आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी कार्य करणारे कोंडीराम पवारटायगर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना गती ; गरजूंना मदतीचा कायम आधार

टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव तसेच मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्कप्र

राडी येथे खेती बचाव अभियानाचा शुभारंभ; शेतकर्‍यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
बी.फार्मसी महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभराजकिशोर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ; जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या निषेधार्थ अंबाजोगाई बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद



टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव तसेच मराठवाडा अध्यक्ष उमेशभाऊ पोखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली टायगर ग्रुपचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख कोंडीराम पवार हे सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. रूग्णसेवा, रक्तदान, गरजूंना मदत आणि सार्वजनिक प्रश्नांवर पाठपुरावा अशा विविध माध्यमांतून ते समाजसेवेचे कार्य करीत आहेत.
रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या गरजू रूग्णांना कोणत्याही वेळी मदतीची आवश्यकता भासल्यास वेळेची पर्वा न करता कोंडीराम पवार मदतीसाठी धाव घेतात. रक्ताची गरज असलेल्या रूग्णांसाठी रक्तदात्यांची व्यवस्था करणे, रूग्णालयातील विविध अत्यावश्यक कामांमध्ये सहकार्य करणे तसेच बाहेरगावाहून उपचारासाठी आलेल्या रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था करून देणे, अशी सेवा ते सातत्याने बजावत आहेत. याशिवाय शासकीय रूग्णालयांमध्ये नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, सिटीस्कॅन यंत्रणा कार्यान्वित व्हावी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय सुविधा वाढविण्यात याव्यात यासाठी त्यांनी वेळोवेळी उपोषण, आंदोलने, निवेदने आणि अर्ज सादर करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. केवळ आरोग्य क्षेत्रापुरतेच नव्हे, तर विविध सामाजिक, सार्वजनिक आणि जनहिताच्या प्रश्नांवरही त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित प्रशासनाकडे निवेदने देणे, आंदोलने करणे आणि प्रश्न मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा करणे, ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती अभियान, गरजूंना मदत आणि सार्वजनिक हिताचे उपक्रम सातत्याने राबविले जात असून, समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि सेवाभावामुळे कोंडीराम पवार यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे

COMMENTS