Homeताज्या बातम्या

दिवसा रेखी- रात्री घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाशबीड एलसीबीची कामगिरी:एक अटक, सव्वापाच लाखांचा ऐवज हस्तगत

बीड : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत दिवसा रेखी करून रात्री घरफोडी करणार्‍या एका कुख्यात टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस

फक्राबाद दरोड्यातील आरोपी जेरबंद
धर्मापुरीत ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; 10 लाखांचा गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत
पोटच्या मुलाने केली बापाची हत्याजामखेड तालुक्यातील अरणगाव येथील घटना ; आरोपी ताब्यात


बीड : स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत दिवसा रेखी करून रात्री घरफोडी करणार्‍या एका कुख्यात टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे 5,00,000 रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पिंपळनेर आणि वडवणी पोलीस ठाण्याकडील एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक 11.07.2026 रोजी रात्रीच्या सुमारास पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी जेवण करून झोपलेले असताना, रात्री लघवीसाठी घराबाहेर आले असता त्यांना बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडा व कपाट अस्तव्यस्त पडलेले दिसले. कपाटातील सोन्याचे दागिने आणि अंगावरील सोन्याचे दागिने असा ऐवज अज्ञात चोरांनी लांबवला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे पिंपळनेर येथे गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा खांडवी तांडा (ता. गेवराई) येथील गुन्हेगारांनी केल्याचे निष्पन्न झाले. मुख्य आरोपी कृष्णा शेषा राव राठोड (रा. अंबुनाईक तांडा, गेवराई) हा सध्या सासरवाडीला (नाळवंडी तांडा) आल्याची माहिती मिळालट्ठ्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने आपल्या इतर पाच साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडे केलेल्या सविस्तर चौकशीत त्याने खापरवाडी तांडा आणि वडवणी येथेही घरफोडी करून नगदी व सोने चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार खालील गुन्हे उघडकीस आले आहेत: पोलिसात नोंद: पोलीस ठाणे पिंपळनेर (गु.र.नं. 224/2026 क. 304(2), 305(अ) बी.एन.एस.) पोलिसात नोंद: पोलीस ठाणे वडवणी (गु.र.नं. 141/2026 क. 331(4), 305(अ) बी.एन.एस.) आरोपीकडून तब्बल तीन तोळे सोने आणि 10 भार चांदी असा एकूण 5,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार करत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, आणि सहा. पोलीस अधीक्षक बीड (व्यंकटराम) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि शेखर औटे, महेश विघ्ने, आणि अंमलदार विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोविंदा राख्ख, बबन सलगर, आशापाक सय्यद, चालक सिद्धेश्वर मांजरम, सुनील राठोड यांच्या पथकाने पार पाडली आहे.

COMMENTS