Homeताज्या बातम्या

जिंतूर आरटीएसए स्केटिंग एरिनाच्या ७० मीटर स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

जिंतूर: जिंतूर शहरातील आरटीएसए (RTSA) स्केटिंग एरिनाच्या वतीने आयोजित ७० मीटर स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २२ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्

अभिनेता सोनू सूदच्या मुलाला शमीने दिले क्रिकेटचे टिप्स
कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने रचला इतिहास
जयंत प्रिमियर कबड्डी लिगचे स्व. जगदीशआप्पा पाटील रायडर्स संघ विजेता

जिंतूर: जिंतूर शहरातील आरटीएसए (RTSA) स्केटिंग एरिनाच्या वतीने आयोजित ७० मीटर स्केटिंग स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २२ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ. पंडित दराडे आणि तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहरुख जानेमिया पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते स्पर्धेत विजेते ठरलेल्या खेळाडूंना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दराडे म्हणाले की, खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व खेळातूनच व्यक्तिमत्व घडते. त्यामुळे शासनाबरोबरच स्थानिक संस्थांनीही खेळांना सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे. तालुका क्रीडा मार्गदर्शक शाहरुख पवार यांनी खेळाडूंना शिस्त, मेहनत आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला दिला, तसेच जिंतूरमध्ये अशी उत्कृष्ट स्केटिंग अकॅडमी सुरू केल्याबद्दल स्केटिंग कोच पुष्कर डहाके यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाची सुरुवात सोनिया अच्छा मॅडम यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन प्रशिक्षकांनी केले, तर आभार प्रदर्शन लोकशाही पत्रकार संघ जिंतूरचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन डहाके पाटील यांनी मानले. या प्रसंगी मोठ्या संख्येने खेळाडूंचे पालक, विद्यार्थी व क्रीडा रसिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीएसए स्केटिंग एरिनाचे सर्व पदाधिकारी व प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.

COMMENTS