Homeताज्या बातम्या

ब्लॅकमेल करत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; वांबोरीतील फरहान शेखवर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीला तिचे सेल्फी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि

बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील धक्कादायक घटना
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त, विक्रेत्यांत खळबळ
नगर : तोफखान्याची 'डिटेक्शन ब्रँच' 'कलेक्शन' मोडवर

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थिनीला तिचे सेल्फी फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि पालकांना पाठविण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फरहान सादिक शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी) याच्याविरुद्ध मंगळवारी (२१ जुलै) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणारी पीडित विद्यार्थिनी शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. संशयित आरोपी फरहान शेख हादेखील त्याच महाविद्यालयात शिकत असल्याने दोघांची मैत्री होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी फरहानने दोघांचे एकत्रित सेल्फी फोटो मोबाईलमध्ये काढले होते. त्यानंतर हे फोटो तिच्या पालकांना पाठवून देण्याची धमकी देत त्याने विद्यार्थिनीवर मानसिक दबाव निर्माण केला.

भीतीपोटी पीडित विद्यार्थिनी त्याच्या संपर्कात राहिली. २ मार्च आणि १८ मार्च रोजी फरहानने तिला डोंगरगण परिसरात फिरण्यासाठी येण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानंतरही संशयिताने अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ पाठविण्याची मागणी केली. फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या भीतीमुळे विद्यार्थिनीने स्नॅपचॅटद्वारे व्हिडिओ पाठविला. मात्र, त्यानंतरही फरहानने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर दोघींनी तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS