Homeताज्या बातम्या

टेंभुर्णी येथे वारकऱ्यांचा घोंगडी देऊन सन्मान; सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

देवळाली प्रवरा: पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देवळाली प्रवरा येथील स

मुस्कान शेख व छाया पांचाळ प्रसुती दरम्यान मातामृत्यू प्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! बीड जिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन
मोहरम निमित्त शहरात विद्यार्थ्यांना वह्या वाटप; शफी हज टुर्स आणि सामाजिक संस्थांचा पुढाकार
श्रद्धेच्या तिजोरीवरचा दरोडा! अयोध्येतील राममंदिर दानपेटीतील गैरव्यवहारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप

देवळाली प्रवरा: पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देवळाली प्रवरा येथील सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाने टेंभुर्णी येथे दिंडी सोहळ्याला विशेष भेट दिली. या प्रसंगी वारकऱ्यांचा घोंगडी देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला.

राहुरी तालुक्यातील विविध दिंड्या मंगळवारी टेंभुर्णी परिसरात दाखल झाल्या होत्या. या वेळी सुरेंद्रभाऊ थोरात मित्र मंडळाच्या सदस्यांनी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. दिंडीतील चालक व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा घोंगडी प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच प्रवासादरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणींवर मात करण्याबाबत मार्गदर्शन करत सर्व वारकऱ्यांना उर्वरित प्रवासासाठी भावूक वातावरणात शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी “जय हरी विठ्ठल”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

या उपक्रमास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, राजाभाऊ खेवरे, बबनराव जऱ्हाड, साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोढवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, पत्रकार रफीक शेख, चंद्रकांत कपाळे, किशोर पंडित, रमेश मुसमाडे, बाबासाहेब भूमकर, सुरेश अंबिलवादे, आदिनाथ राजळे, सोमनाथ भागवत आणि मच्छिंद्र पठारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वारकऱ्यांची सेवा करत त्यांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व दिंडीतील वारकऱ्यांकडून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

COMMENTS