Homeताज्या बातम्या

पेन्शनवाढीची मागणी पूर्ण होईपर्यंत लढा देणार : पोखरकर

श्रीरामपूर: विविध संस्थांमधील ईपीएस ९५ च्या निवृत्त पेन्शनधारकांना दरमहा साडेसात हजार रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा ही मागणी पूर्ण होईपर्यंत राष

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पंकजाताई मुंडे यांची सांत्वनपर भेट; कै. किसनराव मोहोळ यांना वाहिली श्रद्धांजली
पाटोद्यात आज सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन; विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन
जिल्हा न्यायालय बीड येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा! दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन
पेन्शनधारकांसाठी आनंदाच बातमी; आता दरवर्षी बँकेत खेटे घालावे लागणार नाहीत -  Marathi News | Pensioners will be able to get life certificate from post  office | TV9 Marathi

श्रीरामपूर: विविध संस्थांमधील ईपीएस ९५ च्या निवृत्त पेन्शनधारकांना दरमहा साडेसात हजार रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा ही मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रीय संघर्ष समितीमार्फत संघटित लढा दिला जाईल. या लढ्याला अधिक व्यापक आणि संघटित स्वरूप येण्यासाठी संबंधित सर्व पेन्शनधारकांनी एकत्र येण्याचे आवाहन राष्ट्रीय संघर्ष समितीचे सुभाष पोखरकर यांनी केले आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या डॉ. बाबुरावदादा तनपुरे सभागृहात जिल्हा बँकेचे निवृत्त अधिकारी अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शनधारकांचा मेळावा पार पडला. त्याप्रसंगी पोखरकर यांनी राष्ट्रीय संघर्ष समितीची भूमिका मांडली.

पोखरकर म्हणाले की, देशातील विविध संस्था, महामंडळे व कारखान्यांमधील सुमारे ८० लाख पेन्शनधारक गेली १० वर्षांपासून दरमहा ७,५०० रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा यासाठी कॅप्टन अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत आहेत. ही रास्त मागणी पूर्ण करून घेण्यासाठी सर्व पेन्शनधारकांनी शेवटपर्यंत लढा देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्याचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के यांनी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघटित लढ्यासोबतच प्रसंगी न्यायालयीन लढाही दिला जाईल, असे सांगत संघटनेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विनायक लोळगे, सुलेमान भाई, भोपे, जगधने, तनपुरे, नानासाहेब शेळके, अविनाश सालके, गोकुळ चिंतामणी व जिल्हाध्यक्ष संपत समिंदर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी ईघे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS