Homeताज्या बातम्या

महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा 

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात पार पडला.  या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
कोल्हारजवळील गर्भगिरी डोंगराला भीषण आग;एक हजार एकर क्षेत्राचे नुकसान, पशुपक्षी, झाडांची राख
तुम्ही शाळेत प्रवेश घ्या; पाणी-घरपट्टी आम्ही भरतो !संक्रापूर शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयात गुरुकुल पालक मेळावा उत्साहात पार पडला.  या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे  सदस्य अशोक रोहोकले होते.

यावेळी शाळा समितीचे सदस्य संदीप रोहोकले उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये आजचे पालक हे जागृत झाले आहेत. पाल्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी पालक शिक्षक संवाद झाला पाहिजे. शालेय इमारतीसाठी सर्वांनी मदत करावी यासाठी पालकांना आवाहन केले. शिस्त असेल तरच विद्यार्थी घडतात असेही ते म्हणाले.

विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा सहाय्यक विभागीय अधिकारी (उत्तर विभाग) बी.एस. नाईकवाडी यांनी आपल्या मनोगतात संस्थेने सुरू केलेल्या गुरुकुल प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली.  विद्यालयामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात त्याची माहिती सांगितली. विद्यार्थी हा गुणसंपन्न असला पाहिजे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी पालकांच्या सहकार्याची विद्यालयास आवश्यकता आहे.           

 यावेळी पालक मेळाव्यास गटशिक्षणाधिकारी पवार यांनीही उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.  उपगटशिक्षणाधिकारी सागर राख, भाळवणी गटाचे केंद्रप्रमुख उत्तम फंड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निशिकांत रोहोकले, चेमटे वनिता (मुंबई पोलीस), प्रकाश लकडे, भिकाजी चेमटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन  रोहोकले एस.एस. यांनी केले. आभार गहाणडुले यांनी मांडले. मेळाव्यासाठी भाळवणी परिसरातील बहुसंख्य पालक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS