Homeताज्या बातम्या

धनादेश न वटल्यामुळे कर्जदारास चार महिन्याचा कारावास

अहिल्यानगर : श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यांयदंडाधिकारी डी. डी. कर्वे यांनी कर्जदारास ४ महिना साध्या कारावासाची व ९ लाख ८६ हजार रुपये दंडाचीशिक्षा सुनावली.  तसेच दंड न भरल्यास आणखी १५ दिवस कारावास व दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख ८३ हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून दिले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे. संदीप लक्ष्मण सपकाळ (रा. शिंगवे नाईक, श्रीराम मंदिराजवळ, ता – नगर, जि – अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी संदीप लक्ष्मण सपकाळ यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडुन टाटा एस के १६१६ टर्बो एफ-बी-टी याचा वाहन क्र. एम. एच ४८ जे-३३९६ यावर ६ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले होते. सदर कर्जाची फेड संदिप लक्ष्मण सपकाळ यांनी न केल्याने सदर कर्जाचे परतफेडीपोटी त्यांनी फायनान्स कंपनीस कोटक महेंद्रा बँक, शाखा शिंगवे, नगर-मनमाड रोड अहमदनगर या बँकेचा चेक रक्कम रुपये ६ लाख रुपयांचा धनादेश २६ जुन २०१९ रोजी दिलेला होता. सदरचा धनादेश न वटता परत आल्याने फिर्यादी कंपनीने संदिप लक्ष्मण सपकाळ (रा. शिंगवे नाईक, श्रीराम मंदिराजवळ, ता. नगर, जि. अहिल्यानगर) यांचे विरुध्द नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांकडे केस दाखल केलेली होती.सदर केसमध्ये फिर्यादी कंपनीचे वतीने विकास बाळासाहेब बडे यांनी दिलेली साक्ष ग्राहय धरुन अतिरिक्त मुख्य न्यांयदंडाधिकारी डी. डी. कर्वे यांनी कर्जदारास ४ महिना साध्या कारावासाची व ९ लाख ८६ हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास आणखी १५ दिवस कारावास व दंडाच्या रक्कमेपैकी ९ लाख ८३ हजार रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणुन दिले जावेत अशी शिक्षा सुनावली आहे. सदर केसमध्ये फिर्यादी कंपनीतर्फे ऍड. पोपट ज्ञानदेव म्हस्के यांनी कामकाज पाहिलेले आहे.

राष्ट्रवादी चित्रपट, कला, साहित्य व सांस्कृतिक सेलच्या जिल्हा सरचिटणीसपदी रियाज पठाण
भंडारदरा धरणात पर्यटकाचा बुडून मृत्यू
संगमनेर तालुक्यातील रस्त्यांसाठी 17 कोटींचा निधी
कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने दंडासह कारावासाची शिक्षा - konkan24taas.com

COMMENTS