Homeताज्या बातम्या

भोंदूगिरीतून ३७ कोटींची मनी लाँडरिंगकॅप्टन खरातची ३६ कोटींची मालमत्ता जप्त

नाशिक : स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून भाविकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात  उर्फ कॅप्टनची तब्बल ३६ कोटी ९० लाख रुपयांची

SIT ची मोठी कारवाई! अशोक खरातच्या लॅपटॉपमधून धक्कादायक डेटा रिकव्हर; १६ फोल्डर्सनी खरातच्या अडचणी वाढवल्या.
शिरपूरनंतर साक्रीत भोंदू बाबाचा थरार; अडचणी दूर करायला गेलेल्या तरुण-तरुणीचा निर्घृण खून!
इथे आत्मे फिरतात आणि विकास रोखतात छ.संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीबाबत मंत्री शिरसाट यांचे विधान
🚨 नाशिकमध्ये मधाच्या नावाखाली ९ लाखांचा 'गोड' गंडा! भोंदू अशोक खरातचा नवा कारनामा उघड. नाशिकचा वादग्रस्त भोंदू अशोक खरात पुन्हा एकदा ...

नाशिक : स्वतःला भगवान शिवाचा अवतार सांगून भाविकांना कोट्यवधी रुपयांना लुटणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात  उर्फ कॅप्टनची तब्बल ३६ कोटी ९० लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. अंधश्रद्धेच्या बाजारातून गोळा केलेला हा काळा पैसा सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून पांढरा (मनी लाँडरिंग) केल्याप्रकरणी ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसने बाबा, त्याची पत्नी कल्पना खरात  यांच्यासह सहा जणांविरोधात विशेष न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात याने आजार बरे करणे, संकट निवारण आणि व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून अवतार पूजाच्या ना-वाखाली भाविकांची फसवणूक  केली होती. या गुन्हेगारीतून मिळालेला पैसा त्याने नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथे नातेवाईकांच्या नावावर स्थावर मालमत्तेत गुंतवला होता, असे इडीच्या तपासात समोर आले आहे.नाशिक शहरासह ग्रामीण भागात, तसेच अहिल्यानगरच्या शिर्डी, राहता पोलिस ठाण्यांमध्ये भोंदू अशोक खरात याच्याविरुद्ध दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला होता. राज्यभरातून शेकडो भक्तांना धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली गंडवून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी केल्याचा आरोप अशोक खरात याच्यावर आहे. स्वतः दैवी अवतार असल्याचे सांगून ‘अवतार पूजा’, असाध्य आजार बरे करणे, दुर्दैव दूर करणे आणि व्यवसायात भरभराट घडवून आणण्याचे आमिष दाखवून भक्तांकडून रोख रक्कम, दागिने आणि मालमत्ता हडपल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.यापूर्वी १९ मे २०२६ रोजी ईडीने अशोक खरात यास अटक केली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत कारागृहात त्याचा मुक्काम आहे. त्याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, पुढील काळात आणखी थक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS