Homeताज्या बातम्या

गोळेगाव पुतळा प्रकरणातील 8 शिवप्रेमींना जामीन मंजूरअ‍ॅड. आर. एस. खुणे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा

बीड जिल्ह्यातील बहुचर्चित गोळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता सार्वजनिक व शासकीय जागेव

हप्त्याची मागणी;व्यापार्‍याला मारहाण
गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर पोलिसांचा घाव; पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त व नष्ट
मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध रेती उत्खननाविरोधात 2.90 कोटींचा मुद्देमाल जप्त



बीड जिल्ह्यातील बहुचर्चित गोळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा शासनाची आवश्यक परवानगी न घेता सार्वजनिक व शासकीय जागेवर उभारण्यात आला. व त्यामुळे 8 अज्ञात शिवप्रेमीवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 113/2026 दाखल करण्यात आला होता.ग्रामपंचायत अधिकारी अयोध्या रंगनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोळेगाव येथील मुख्य चौकात सार्वजनिक जागेवर काही व्यक्तींनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. संबंधित जागा शासकीय व सार्वजनिक स्वरूपाची असून तेथे अनाधिकृत अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या उभारणीमुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून अनिल प्रकाश काळे, परमेश्वर पंडित काळे, सचिन सुग्रीव काळे, केशव कडाजी काळे,किरण ज्ञानेश्वर ढेरे,सुहास परमेश्वर काळे, दिलीप पंडितराव काळे, ज्ञानेश्वर श्रीमंत काळे यांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, सर्व शिवप्रेमींनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 483 अंतर्गत जामिन साठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. राहुल खुणे यांनी प्रभावी व जोरदार युक्तीवाद मांडला सदरील युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.

COMMENTS