Homeताज्या बातम्या

 भीषण अपघात वारकऱ्याचा  मृत्यू

सोनई  : नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई फाटा येथे शनिवारी (दि. ११) घडलेल्या भीषण अपघातात पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या एका वारकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गंगाराम जाधव (वय ७०, रा. इडोळी, जि. हिंगोली) हे पंढरपूरच्या दिशेने वारीसाठी जात असताना शिंगवे तुकाई फाटा परिसरात एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना उपचारासाठी नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोनई पोलीस ठाण्याला दिल्यानंतर  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांतून हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी जात आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक अधिकख काळजीपूर्वक नियंत्रित करण्याची तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी वारकरी व नागरिकांकडून होत आहे.

मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!
कांदा लिलावासाठी घालून घरी परतत असलेल्या शेतकर्‍याच्या दुचाकीची समोरासमोर धडक;एक ठार,एक गंभीर जखमी!
भवानी चौक ठरू लागला अपघाताला निमंत्रण
Six tourists killed in road accident in Himachal Pradesh's Chamba district | Akashvani News

COMMENTS