Homeताज्या बातम्या

केस मागे घेण्याच्या वादातून लोखंडी विळ्याने हल्ला

सोनई : नेवासा तालुक्यातील करजगाव येथे जुना न्यायालयीन वाद मागे घेण्याच्या कारणावरून शेतात काम करणाऱ्या महिलेवर लोखंडी विळ्याने हल्ला करून मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. १२) सकाळी घडली. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोनई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिराबाई अभय फुलसौंदर (वय ४०, रा. करजगाव, ता. नेवासा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते घराजवळील शेतात काम करत असताना घरी जात असताना आरोपी सुनीता चंद्रकांत फुलसौंदर व स्नेहल संदीप फुलसौंदर (दोघी रा. करजगाव) यांनी त्यांना अडवले. फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादीस “तुम्ही आमच्याविरुद्ध दाखल केलेला केस मागे घ्या,” अशी मागणी केली. त्यावर फिर्यादीने “मी केस मागे घेणार नाही, न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो मान्य राहील,” असे सांगितल्याने आरोपी संतप्त झाल्या.यानंतर आरोपी सुनीता फुलसौंदर यांनी लोखंडी विळ्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून दुखापत केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. दुसऱ्या आरोपीने फिर्यादीला धरून शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.घटनेदरम्यान फिर्यादीची पत्ती भांडण सोडविण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत “केस मागे घेतली नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनई येथे उपचार करण्यात आले.  याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डीए आव्हाड अधिक तपास करत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!
अकोले तालुक्यात पेट्रोल पंप चालकांच्या अजब नियमामुळे खळबळ; शेतकऱ्यांना डिझेलसाठी आता ‘सातबारा’ द्यावा लागणार? अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल!
ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
लोखंडी रॉड अन् लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाला लुटले, 7 जणांवर गुन्हा दाखल  | Navarashtra

COMMENTS