मुंजवडी गावातील हातभट्टीचे अड्डे उध्वस्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंजवडी गावातील हातभट्टीचे अड्डे उध्वस्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी गाव

बत्ताशावर कुस्ती खेळणार्‍या पैलवानाने हिंद केसरीची बरोबरी करू नये : ना. शंभूराज देसाई
विद्यार्थिनींच्या सरंक्षणासाठी सर्व शाळांना मिळणार होमगार्ड
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध

फलटण / प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून फलटण ग्रामीण पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार गावठी हातभट्टी दारू असा 3 लाख 14 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहिती अशी की, फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील भिवरकरवस्ती पैलवान बाबा मंदिराच्या शेजारील ओढ्याच्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या गावठी दारू अड्यावर दि. 30 रोजी अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून वसंत नारायण पवार (वय 70) शंकर राजेंद्र मसुगडे (वय 23), मनोज विजय पाटोळे (वय 25) सर्व रा. धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांच्याकडे 1 लाख 89 हजार 700 रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल सापडला आहे. तसेच अर्जुन छगन जाधव (वय 25), रा. हणमंतवाडी, ता. फलटण यांच्याकडे 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल आहे. तर संगीता बल्या भोसले (वय 45) रा. मुंजवडी, ता. फलटण यांच्याकडे 70 हजार 800 रुपयांची बेकायदेशीर हातभट्टीसह इतर साहित्य सापडले आहे. यामध्ये 50 लीटर तयार झालेली हातभट्टी दारू, 2200 लीटर हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, बाभळीची साल, पातळ गूळ, खराब बॅटरी, गॅस सिलेंडर इत्यादी साहित्य असा एकूण 3 लाख 14 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सपोनि सोनवणे, दराडे, पोलीस उपनिरीक्षक अरगडे करत आहेत.
फलटण तालुक्यातील अनेक भागात अनेक दिवसापासून गावठी दारू अड्डे बेधडकपणे सुरू असून फलटण ग्रामीण पोलिसांनी अशा सर्व अड्ड्यावर कारवाई करण्याची मागणी या तीन कारवाईमुळे जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी येणार्‍या काळात अशा बेकायदेशीर गावठी दारू अड्याबाबत माहिती असल्यास स्थानिक पातळीवर माहिती न देता वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी केले आहे.

फलटण : फलटण ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत उध्दवस्त केलेला अवैध दारुचा अड्डा

COMMENTS