Homeताज्या बातम्या

खंडोबाची वाकडी येथील दिंडी सोहळ्याचे प्रस्थान

राहाता : खंडोबाची वाकडी येथील जय मल्हार पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले, यावर्षी वाकडी येथील जय मल्हार पायी दिंडी सोहळ्याचे नवनियुक्त अध्यक्ष गंगाधर  कोते यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने चोख नियोजन करण्यात आले. वाकडी येथील जय मल्हार पायी दिंडी सोहळ्याला 19 वर्ष पूर्ण झाले. यावर्षी पायी दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आलेला आहे. जय मल्हार पायी दिंडी सोहळ्यातील दरवर्षी होणाऱ्या वारकऱ्यांच्या उपस्थिती मागे पायी दिंडी कमिटीचे नियोजन दिसून येत आहे, दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चहा, नाश्ता, दोन टाईम भोजन, फिल्टर युक्त पाणी, आंघोळीसाठी पाण्याचा टँकरची व्यवस्था, वारकऱ्यांचे सामान ठेवण्यासाठी वाहनांची व्यवस्था, रात्री झोपण्यासाठी तंबूची व्यवस्था ,गोळ्या औषधे अशी सर्व प्रकारची व्यवस्था जय मल्हार पायी दिंडी कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे दिंडीचे वाकडी ते पंढरपूर पर्यंत जवळपास 13 ठिकाणी मुक्काम असणार आहेत यावर्षी मशागतीची सर्व कामे झालेली असल्याकारणाने यावर्षी वाकडी येथील पायी दिंडी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आलेला आहे.

आषाढी वारीतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद400 हून अधिक वारकर्‍यांना आरोग्यसेवा व उपचारांचा लाभ
बालमटाकळीत पैठणच्या शांतीब्रम्ह एकनाथ महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत
वारकर्‍यांच्या ’चरण सेवेला’ प्रारंभ; भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

COMMENTS