बीड : वै. प. पू. गु. राजाभाऊ बापूजी नानोटे महाराज संस्थान, गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्

बीड : वै. प. पू. गु. राजाभाऊ बापूजी नानोटे महाराज संस्थान, गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पायी दिंडी प्रस्थान झाली आहे. विठ्ठल नामाचा अखंड गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
या पायी दिंडीचे आज रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सकाळी श्री दत्त संस्थान, बालाघाट, कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकरी, भाविक आणि सेवेकर्यांसाठी प्रेमपूर्वक नाश्त्याची व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकर्यांनी आनंदाने प्रसादाचा लाभ घेत संस्थानच्या सेवाभावाचे कौतुक केले. वारकरी संप्रदायात सेवा, समर्पण आणि भक्तीला विशेष महत्त्व आहे. त्याच परंपरेचे जतन करत श्री दत्त संस्थानच्या वतीने वारकर्यांची मनोभावे सेवा करण्यात आली. वारकर्यांनी विठ्ठल-रखुमाईंच्या नामस्मरणात तल्लीन होत पुढील प्रवासाला प्रारंभ केला. यावेळी उपस्थितांनी श्री विठ्ठल-रखुमाई तसेच श्री दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करत, वारकर्यांची सेवा अखंड सुरू राहो, सर्व भाविकांना उत्तम आरोग्य लाभो आणि ही पवित्र वारी सुखरूप पूर्ण होवो, अशी भावना व्यक्त केली. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थितांनी श्री विठ्ठल-रखुमाईंचे नामस्मरण करत भक्तीभावाने सेवा कार्यात सहभाग नोंदविला. वारकर्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानत श्री दत्त संस्थानच्या वतीने ही सेवा दरवर्षीप्रमाणे भावपूर्ण वातावरणात पार पडली. श्री विठ्ठल-रखुमाई यांच्या कृपेने वारकर्यांची ही सेवा अखंड सुरू राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

COMMENTS