Homeताज्या बातम्या

नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरेंचे ‘रामरक्षा’ आंदोलनमुख्यमंत्री फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शनाची तयारी

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जुलै रोजी नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित

अयोध्या राम मंदिर देणगीत तब्बल ८० टक्के घट; कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांमुळे भाविकांमध्ये तीव्र संताप
उद्धव ठाकरे करणार रामरक्षा आंदोलनराम मंदिरातील कथित देणगी चोरीवरून आक्रमक
अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणी काँग्रेसचा पाटोदा येथे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहश्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी; पोलीस ठाण्यात दिले निवेदन
नागपूरात 18 जुलैला ठाकरे गटाचे रामरक्षा आंदोलन - Hindusthan Samachar Marathi


नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 18 जुलै रोजी नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय म्हणून ओळखले जात असल्याने या आंदोलनाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
पक्षाच्या म्हणण्यानुसार, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना, काही संशयितांवर कारवाई झाली असली तरी या कथित गैरव्यवहारामागील प्रमुख सूत्रधारांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला. या प्रकरणामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा त्यांनी केला असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीही त्यांनी केली. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, ‘रामरक्षा’ आंदोलनाचा उद्देश कोणत्याही श्रद्धेचा अवमान करणे नसून, प्रभू श्रीराम यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवणे हा आहे. त्यामुळे या आंदोलनातून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून विदर्भात पक्षाचे संघटनात्मक बळही दाखवण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध जिल्ह्यांतील कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि समर्थक नागपुरात दाखल होतील, असा पक्षाचा दावा आहे.

COMMENTS