Homeताज्या बातम्या

भगवद्गीता हे विजयाचे शास्त्र : डॉ. संजय मालपाणी

शेवगाव : भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवनाला दिशा देणारे 'विजयाचे शास्त्र' आहे. जीवनातील कोणत्याही संघर्षात यशस्वी व्हायचे असेल, त

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान : उपमुख्यमंत्री शिंदे
अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन
श्रीगोंद्यात तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचा शैक्षणिक विस्तारएलएल.एम., आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआय-अँड-एमएल अभ्यासक्रमांची सुरुवात

शेवगाव : भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवनाला दिशा देणारे ‘विजयाचे शास्त्र’ आहे. जीवनातील कोणत्याही संघर्षात यशस्वी व्हायचे असेल, तर प्रथम स्वतःच्या मनावर विजय मिळवणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. संजय मालपाणी यांनी केले.कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव काकडे, शिवसेना नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या   हर्षदा काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण बिटाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंग काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी मानवाला कर्तव्य, नेतृत्व, संस्कार, राष्ट्रनिर्मिती आणि जीवनमूल्यांचा अनमोल संदेश दिला आहे. कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे उभारून ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवला. त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरणारा असल्याचे प्रतिपादन ऍड. शिवाजीराव काकडे यांनी प्रास्ताविकपर बोलताना केले. याप्रसंगी आबासाहेब काकडे विद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीचा इतिहास उलगडणाऱ्या ‘साधना’ या विशेष इतिहासग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या संघर्ष, जिद्द आणि शैक्षणिक योगदानाचा जिवंत दस्तऐवज म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जात आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.गोविंद वाणी आणि प्रा.जरीना शेख यांनी केले. कार्यक्रमास पालक,विद्यार्थी,शिक्षक,गीता परिवाराचे सदस्य तसेच शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

COMMENTS