नागपूर : नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली कारवाई तीव्र केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार
नागपूर : नागपुरात अन्न भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आपली कारवाई तीव्र केली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रसिद्ध हिरा स्वीटवर कारवाई केल्यानंतर आता ’इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’ या मोठ्या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती ए. एन. खंदारे यांच्या पथकाने कामठी रोडवरील पिली नदी परिसरातील वांजरा इंडस्ट्री ले-आऊट येथे असलेल्या ’एम/एस इंदूर नमकीन प्रॉडक्ट्स’च्या कारखान्यावर छापा टाकला. या तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आले.

COMMENTS