Homeताज्या बातम्या

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सुरक्षेत त्रुटी

रतलाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेत मध्य प्रदेशातील रतलाम येथे गंभीर त्रुटी आढळल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई

पुणे-संभाजीनगरसह मुंबई बंगळुरू महामार्गाला मंजुरीकेंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती ; प्रवास होणार वेगवान
सुरत-चेन्नई महामार्गग्रस्त शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा; बाळासाहेब थोरातांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चर्चा
मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनसंख्या करणार कमी : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
नितीन गडकरींचं पंतप्रधान-राष्ट्रपती पदाबाबत मोठे विधान; म्हणाले जनतेचं प्रेम…


रतलाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेत मध्य प्रदेशातील रतलाम येथे गंभीर त्रुटी आढळल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर गडकरी यांच्या ताफ्यासमोर अचानक तीन तरुण आल्याने काही काळ खळबळ उडाली. सुदैवाने ताफ्यातील वाहनांनी प्रसंगावधान राखत दुसर्‍या मार्गिकेतून पुढे जात मोठा अनर्थ टाळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रतलाम जिल्ह्यातील शिवगड पुलाजवळ घडली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राजस्थानमधील पाहणी दौरा पूर्ण करून गुजरातच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. ताफ्यातील वाहनांचा वेग ताशी सुमारे 120 किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. घटनेचा एक चित्रफितही समोर आली असून त्यामध्ये महामार्गाच्या मध्यभागी उभे असलेले तीन तरुण वाहनांना थांबण्याचा इशारा करताना दिसत आहेत. मात्र ताफ्यातील वाहनांनी कोणताही अडथळा न येऊ देता दुसर्‍या मार्गिकेतून मार्गक्रमण केले. गडकरी यांनी यापूर्वी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील राजस्थानातील बुंदी ते कोटा या सुमारे 90 किलोमीटरच्या टप्प्याची पाहणी केली होती. त्यानंतर ते गुजरातकडे रवाना झाले. याच प्रवासादरम्यान त्यांचा ताफा रतलाम जिल्ह्यातून जात होता. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तिघांची चौकशी केली. शांतीलाल, नंदलाल भाभर आणि दिनेश भाभर अशी त्यांची नावे असून ते निमकोपाडा पलसोडी गावातील रहिवासी आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांची मुले महामार्गाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या शाळेत शिक्षण घेतात. मुलांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा म्हणून ते वाहनांना थांबण्याचा इशारा करत होते. केंद्रीय मंत्र्यांचा ताफा त्या मार्गाने येणार असल्याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS