Homeताज्या बातम्या

आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठी संघर्षआंदोलनाला महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक विभागाचा भक्कम पाठिंबा : प्रा. प्रकाश सोनवणे

मुंबई : मुसळधार पावसातही विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठीचा लढा आझाद मैदानावर अधिक तीव्र झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील हजारो शिक्ष

रेल्वेच्या रनिंग रूममध्ये भरदिवसा दारु पार्टी
पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी विरोधक आक्रमक
छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी निमित्त !


मुंबई : मुसळधार पावसातही विनाअनुदानित शिक्षकांचा न्यायासाठीचा लढा आझाद मैदानावर अधिक तीव्र झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील हजारो शिक्षक-शिक्षिका आपल्या न्याय्य मागण्यांसाठी भरपावसात आंदोलन करत असून, आजच्या आंदोलनात सुमारे 10,000 शिक्षक व महिला शिक्षिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या आंदोलनस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्‍नांवर काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. प्रा. सोनवणे यावेळी म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रयत्नांमुळे कायम विनाअनुदानित हा शब्द हटविण्यात आला आणि पुढे संबंधित संस्थांना अनुदान देण्याची शिफारसही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारच्या काळात तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पाच वर्षे विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. प्रा. सोनवणे पुढे म्हणाले की, गेल्या वर्षीही याच आझाद मैदानावर हजारो शिक्षकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासने दिली; परंतु आजही शिक्षकांना त्याच मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. सध्या मी विरोधी पक्षात असलो तरी विनाअनुदानित शिक्षकांच्या न्याय्य लढ्याला माझा आणि काँग्रेस पक्षाचा भक्कम पाठिंबा राहील. विधानभवनातील काँग्रेस पक्षाच्या शिक्षक व पदवीधर आमदारांमार्फत या प्रश्‍नावर अधिवेशनात प्रभावीपणे चर्चा करू

COMMENTS