Homeताज्या बातम्या

अयोध्येतील श्रीराम मंदिर कथित दानपेटी चोरीच्या निषेधार्थ माजलगावात शिवसेनेचे घंटानाद व रामरक्षा आंदोलन

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कथित दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजलगाव येथे घंटानाद व राम

शेख राजुभाई यांची गेवराई शहरप्रमुखपदी निवड
फसव्या कर्जमाफीविरोधात शिरूरमध्ये शेतकऱ्यांचा जनआक्रोश; ठाकरे गटाची तहसीलवर भव्य ट्रॅक्टर रॅली
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले



अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कथित दानपेटी चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजलगाव येथे घंटानाद व रामरक्षा आंदोलन करण्यात आले. बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुरामजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलनाथ मंदिर येथे या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेहरुळकर, माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून माजलगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी बीड जिल्हा संघटक नितीन धांडे, उपजिल्हाप्रमुख रामराजे साळुंखे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर जाधव, शहरप्रमुख ड. दत्ता रांजवण, माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल काकडे पाटील, विधानसभा प्रमुख लक्ष्मण सोळंके, विधानसभा समन्वयक दासू पाटील बादाडे, संजय शिंदे, माजी विधानसभा प्रमुख नामदेव सोजे पाटील, तालुका युवा अधिकारी प्रदीप तांबे, विक्रम सोळंके, करण थोरात, जयराम राऊत, नारायण तोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात राम व हनुमान मंदिरात श्रीगणेश व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या महाआरतीने करण्यात आली. त्यानंतर घंटानाद, रामरक्षा पठण, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण भक्तिमय झाले.यावेळी प्रभू रामचंद्र की जय, बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी श्रीराम मंदिरातील कथित दानपेटी चोरीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

COMMENTS