Homeताज्या बातम्या

ओळखीपलीकडे शिक्षणाचा हक्क..!तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना ’स्माईल’ची नवी उभारी..!!शेख आयेशा

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक वर्षे वंचित राहिलेल्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्

श्रीगोंद्यात तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचा शैक्षणिक विस्तारएलएल.एम., आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एआय-अँड-एमएल अभ्यासक्रमांची सुरुवात
समाज परिवर्तनासाठी महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधनउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटनापीएचडी करणारे विद्यार्थी राहुल सोनाळे यांनी केली आत्महत्या



समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेक वर्षे वंचित राहिलेल्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने ’स्माईल (डचखङए)’ शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना दरवर्षी 13,500 रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार असून, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या योजनेचा लाभ इयत्ता 9 वी व 10 वीतील प्री-मॅट्रिक, इयत्ता 11 वी, 12 वी, महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठात नियमित शिक्षण घेणारे भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र असतील. मात्र, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेले अधिकृत ट्रान्सजेंडर आयडेंटिटी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करावा. शिष्यवृत्तीच्या जागा मर्यादित असल्याने लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. शिष्यवृत्तीची रक्कम थेट डीबीटी (ऊइढ) प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार-लिंक बँक खात्यात जमा केली जाईल. ही योजना केवळ आर्थिक मदत नसून, तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षण, समान संधी आणि सन्मानाने भविष्य घडविण्याचा नवा विश्वास देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.
पत्रकार शेख आयेशा यांच्या न्याय मागणीला अखेर सरकारकडून संवेदनशील साथ..
दरम्यान, महाराष्ट्रात तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी अशा स्वरूपाच्या शैक्षणिक सहाय्याची गरज असल्याचे सातत्याने मांडणार्‍या ’आश्रय सेवाभावी केंद्राच्या’ अध्यक्षा तथा पत्रकार शेख आयेशा यांनी या विषयावर अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी शासनाची संवेदनशील भूमिका अधिक ठळकपणे समोर आल्याचे मानले जात आहे.

COMMENTS