अहिल्यानगर : शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळत असतानाच शिक्षकांवर सध्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अंतर्गत मतदार पडताळणी व नोंदणीचे काम सोपविण्यात आले आहे. भर पावसात घरोघरी जाऊन माहिती संकलित करावी लागत असल्याने शिक्षकांची मोठी दमछाक होत आहे.सकाळी शाळेत अध्यापन, त्यानंतर मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहितीची पडताळणी, आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि नोंदी पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये रस्ते चिखलमय झाले असून, दुर्गम वस्त्यांपर्यंत पोहोचताना शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसामुळे अनेक वेळा नागरिक घरी उपलब्ध नसतात. त्यामुळे त्याच ठिकाणी पुन्हा जावे लागत असल्याने कामाचा ताण वाढत आहे. दुसरीकडे शाळेतील नियमित अध्यापन, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन आणि प्रशासकीय कामेही सुरू असल्याने शिक्षकांची दुहेरी कसरत होत आहे.मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे असले, तरी त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व वेळ उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.सध्या पावसाची धार आणि कामाचा वाढता ताण यामध्ये शिक्षकांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

COMMENTS