Homeताज्या बातम्या

चिंचोलीच्या तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील चिंचोली-कोल्हार खुर्द पिण्याच्या पाणी योजनेच्या साठवण तलावात पाटीलवाडी येथील एका ३४ वर्षीय तरुण

चारणवाडीत छापा टाकून ११ लाखांचा गांजा जप्तपारनेर पोलिसांची मोठी कारवाई ; आरोपी फरार
सहकारी बँकांसाठी नियमित व दर्जेदार प्रशिक्षण कार्यक्रम काळाची गरज; सिमला येथील परिषदेत प्रा. भानुदास बेरड यांचे प्रतिपादन
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आयोजनविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील चिंचोली-कोल्हार खुर्द पिण्याच्या पाणी योजनेच्या साठवण तलावात पाटीलवाडी येथील एका ३४ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी (दि. ४) सायंकाळी मित्रासोबत तळ्याकाठी गेल्यानंतर ही दुर्घटना घडली. अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले. मात्र रविवारी सकाळी प्रशासनाच्या संयुक्त रेस्क्यू ऑपरेशनद्वारे मृतदेह बाहेर काढण्यात आला.मृत तरुणाचे नाव कैलास रामदास ठाकरे (वय ३४, रा. पाटीलवाडी, ता. राहुरी) असे आहे. शनिवारी सायंकाळी ते मित्रासह चिंचोली येथील पाणी साठवण तलावाजवळ गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरून ते पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. मात्र अंधार पडल्याने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही यश न आल्याने ती स्थगित करण्यात आली.रविवारी सकाळी राहुरी, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवरा येथील प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या ईआरटी रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने आणि पाणबुड्यांच्या मदतीने तलावात सखोल शोधमोहीम राबविली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कैलास ठाकरे यांचा मृतदेह तलावातील डबक्यात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.या बचाव मोहिमेत राहुरी नगर परिषद, देवळाली प्रवरा नगर परिषद, श्रीरामपूर नगर परिषद, आपत्ती व्यवस्थापनाचे अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखालील  रेस्क्यू टीम, पोलीस कर्मचारी रवी पवार, तलाठी प्रशांत शेटे तसेच जीवनदायी रुग्णवाहिकेचे निखिल भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्याला सहकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली, पाटीलवाडी व कोल्हार खुर्द परिसरात शोककळा पसरली असून कैलास ठाकरे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS