राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 11 ह

राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 11 हजार 166 थकीत कर्जदार शेतकर्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाइन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी दिली.
योजनेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला पात्र कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार लेखापरीक्षकांनी तपासणी करून पात्र ठरविलेल्या 11,166 शेतकर्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात आली आहे. या पात्र शेतकर्यांवरील थकीत कर्जाची एकूण रक्कम 95 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. शासनाची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढवून शेतीला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच ग्रीस्टॅक नोंदणी वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS