Homeताज्या बातम्या

ठाकरे गटाचे आमदारही फूटीच्या उंबरट्यावर ?उद्धव ठाकरेंनी उद्या मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक

मुंबई : राज्यात ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदार बंडांच्या पावित्र्यात असल्याच्य

आता ठाकरेंचे आमदार फूटणार : मंत्री पाटील
डॉ. प्रीतम भी. गेडाम यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार; राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने गौरव
अशोक खरातला 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का?माजी मंंत्री दीपक केसरकर यांचा संतप्त सवाल
मातोश्रीवर बैठक, पण उमेदवारी अर्जच गायब; ठाकरे गटात नेमकं काय चाललंय?


मुंबई : राज्यात ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटल्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही पक्ष सोडल्यानंतर आणखी आमदार बंडांच्या पावित्र्यात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच राबवण्याचे संकेत दिल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सावधगिरी बाळगत उद्या मंगळवारी मातोश्रीवर आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.
उद्धव ठाकरे मातोश्रीवरील बैठकीत उर्वरित आमदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या भूमिका जाणून घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात सभागृहातील कामकाज, जनहिताचे प्रश्‍न आणि पक्षाची पुढील दिशा यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक पुनर्बांधणी, कार्यकर्त्यांचा विश्‍वास दृढ करणे आणि जनतेपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारमंथन होणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी वेगळी भूमिका स्वीकारल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसून आले. त्यानंतर आता उर्वरित आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींवर विविध पक्षांचे लक्ष केंद्रीत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यामुळे ठाकरे गट अधिक सावध भूमिका घेत असून, पक्षातील संवाद वाढवून एकात्मता मजबूत करण्यासाठी नेतृत्व सक्रिय झाले आहे. पक्षातील प्रत्येक प्रतिनिधीशी संपर्क ठेवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील काही लोकप्रतिनिधींना आर्थिक प्रलोभने आणि भविष्यातील राजकीय संधींची आश्‍वासने दिली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित पक्षांकडून अधिकृत प्रतिक्रिया आणि स्वतंत्र पुष्टी अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्यांकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चौकटीतून पाहिले जात आहे.
मातोश्रीवरील बैठकीला किती आमदार राहणार उपस्थित ?
ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी कुणकुण लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. त्यावेळी बहुतांश खासदार अनुपस्थित होते. मात्र ऑनलाईन उपस्थित राहून त्यांनी पक्षासोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणे पसंद केले होते. त्यामुळे आमदारांची बैठक किती प्रभावी ठरते, अणि किती आमदार उपस्थित राहतात, किती अनुपस्थित राहतात, याचे उत्तर मंगळवारी मिळेल. या बैठकीत पक्षाची पुढील वाटचाल, संघटनात्मक निर्णय, जनतेशी संवादाची रणनीती आणि आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठीची भूमिका निश्‍चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीतून कोणते संदेश दिले जातात आणि पुढील राजकीय घडामोडींवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS