Homeताज्या बातम्या

मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू

मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल

सांगलीत लग्नाच्या आनंदावर विरजण; येरळा नदीत पोहताना ८ मुलं बुडाली
रिल्सच्या नादात समृद्धीवर भीषण अपघात; चिमुकल्याचा मृत्यू, 25 जखमी!
कांदा लिलावासाठी घालून घरी परतत असलेल्या शेतकर्‍याच्या दुचाकीची समोरासमोर धडक;एक ठार,एक गंभीर जखमी!
मुंबईत झाड कोसळून १२ तासांत दोघांचा मृत्यू; कुर्ला, आरेतील दुर्घटनांनी  पालिकेवर प्रश्नचिन्ह - Satara Pratinidhi


मुंबई : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईत झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून, आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. कुर्ला परिसरात रविवारी भलेमोठे झाड अंगावर कोसळल्याने 63 वर्षीय युनूस हकीमुद्दीन शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबईतील आरे कॉलनीत झाडाची फांदी अंगावर पडून एका 18 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला. मृताची ओळख साकीनाका येथील रहिवासी हसन रझा जहांगीर आलम सय्यद अशी पटली आहे. त्याला मालाड पूर्व येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, नौपाडा परिसरातील महापालिकेच्या शाळेजवळ ही दुर्घटना घडली. युनूस शेख यांनी नुकतेच परिसरात एक नवे दुकान खरेदी केले होते. त्या दुकानाच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी ते रविवारी तेथे आले होते. रस्त्यालगत उभे असताना अचानक एक विशाल वृक्ष त्यांच्या अंगावर कोसळला. झाड कोसळण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जवळील फौजिया रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण घटनेचे चित्रण परिसरातील देखरेख कॅमेर्‍यात नोंदले गेले असून ते समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. काही क्षणांत घडलेल्या या भीषण दुर्घटनेने नागरिकांना हादरवून सोडले आहे. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. झाड कोसळल्यानंतर बराच वेळ महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. कुर्ल्यातील दुर्घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी आरे परिसरातही अशाच प्रकारे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मुसळधार पावसादरम्यान दुचाकीवरून प्रवास करत असताना 18 वर्षीय कुमार हसन रझा जहांगीर आलम सय्यद याच्या डोक्यावर झाडाची मोठी फांदी कोसळली. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शहरभर दुर्घटनांची मालिका
गेल्या काही दिवसांत मुंबईतील विविध भागांमध्ये झाडे आणि फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर अनेक मुले जखमी झाली होती. सांताक्रूझ येथे झाड पडल्याने आठ जण जखमी झाले. दादरमध्ये घराच्या छतावर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सायन, माहीम, पवई, विक्रोळी आणि घाटकोपर परिसरातही अशा घटना नोंदविण्यात आल्या आहेत.
मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्‍नचिन्ह
प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, छाटणी आणि आवश्यक ती प्रतिबंधक कामे केल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरभर सुरू असलेल्या या दुर्घटनांमुळे त्या दाव्यांच्या परिणामकारकतेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मते, केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी, जुन्या वृक्षांची तपासणी आणि तातडीने धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम राबविणे आवश्यक आहे. अन्यथा निष्काळजीपणाची किंमत सामान्य नागरिकांना जीव गमावून चुकवावी लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS