Homeताज्या बातम्या

अचूक मतदार यादी हाच लोकशाहीचा पायाजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे नांदेडकरांना विशेष आवाहन

’अचूक मतदार यादी हाच लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने स

गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर; १७ जून रोजी हरकतींसाठी विशेष बैठक
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गोदावरी पात्रातील अवैध वाळू उत्खननावर मध्यरात्री छापा; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्ड आरक्षण जाहीर



’अचूक मतदार यादी हाच लोकशाहीचा पाया आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे,’ असे मोठे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यासह नांदेड जिल्ह्यातही मतदार याद्यांच्या पडताळणीची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम 30 जून ते 29 जुलै या कालावधीत राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्यक्ष घराघरांमध्ये जाऊन तपासणी करणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे 27 लाख मतदारांच्या घरी स्वतः बीएलओ भेट देऊन मतदार याद्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. बीएलओ घराघरांमध्ये आल्यानंतर ते प्रत्येक नागरिकाला दोन इन्युमरेशन फॉर्म  देतील. प्रगणकांनी त्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती मतदारांनी सर्वप्रथम व्यवस्थित तपासून घ्यावी. जर माहितीमध्ये किंवा नावामध्ये काही चुका असतील, तर त्याच वेळी बीएलओंच्या निदर्शनास आणून द्याव्यात व दुरुस्त करून घ्याव्यात. यासोबतच, नागरिकांनी आपला अद्ययावत   फोटो बीएलओंकडे जमा करणे आणि दोन्ही इन्युमरेशन फॉर्मवर स्वतःची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. बीएलओ घरी येण्यापूर्वी मतदारांनी ’ईसीआय’ च्या संकेतस्थळावर जाऊन आपला सर्व तपशील, नाव आणि इतर माहिती आधीच तपासून ठेवावी, जेणेकरून प्रगणकांचे काम सोपे होईल. तसेच, निवडणूक आयोगाने सुचवलेले वयाचे आणि ओळखीचे पुरावे नागरिकांनी आधीच तयार ठेवावेत. यामध्ये जन्माचा दाखला, 10 वीचे प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, जमिनीचे उतारे किंवा वनहक्क दाव्यांची प्रमाणपत्रे यांसारख्या 12 मान्यताप्राप्त पुराव्यांपैकी आवश्यक कागदपत्रे रेडी ठेवावीत, जेणेकरून पडताळणीची प्रक्रिया गतीने पूर्ण होईल. नांदेड जिल्ह्यातील एकही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये आणि मतदार यादी पूर्णपणे अचूक व पारदर्शक व्हावी, यासाठी नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेवटी केले आहे.

COMMENTS