Homeताज्या बातम्या

इतवारा पोलिसांची मोठी कारवाई; 6,500 प्रतिबंधित गोळ्या, 771 ग्रॅम गांजा व तलवार जप्त

नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे, गांजा आ

नांदेडमध्ये एलसीबीची धडक कारवाईतेलंगणातील तस्कर अटकेत, 1 किलो 40 ग्रॅम गांजा जप्त, महिला आरोपी फरार
धर्मापुरीत ‘एलसीबी’ची मोठी कारवाई; 10 लाखांचा गांजा जप्त, दोन आरोपी अटकेत
३ कोटींच्या ७०२ किलो गांजाच्या साठ्यासह दोघांना अटक; एनसीबीची गोंदियात मोठी कारवाई



नांदेड जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित औषधे, गांजा आणि एक तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी विनोद रामचंद्र जोधळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस स्टेशन इतवारा येथे गुन्हा क्रमांक 229/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(सी), 20(बी)(ळळ)(बी) तसेच इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी प्रिगालॅब-300 (झीशसरश्ररल-300) या प्रतिबंधित औषधाच्या 65 बॉक्समधील एकूण 6,500 गोळ्या, 771 ग्रॅम गांजा आणि एक तलवार जप्त केली.  पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक खनाळ व संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणातील इतर आरोपी तसेच अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शोध सुरू असून त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS