Homeताज्या बातम्या

बीड जिल्हा कामगार संघाकडून नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेबांचे स्वागत; कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन

बीड जिल्हा कामगार संघाच्या वतीने नुकतीच नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कामगारांच्या व

सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश
काळेगाव हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के7 विद्यार्थिनींची 90 टक्क्यांहून अधिक गुणांची कमाई
शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभाग बीड जिल्हाप्रमुखपदी ए. एस. गोलू यांची नियुक्ती



बीड जिल्हा कामगार संघाच्या वतीने नुकतीच नवनियुक्त सरकारी कामगार अधिकारी देशमुख साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, देशमुख साहेब यांनी हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे.
 कामगारांच्या हितासाठी प्रशासन कटिबद्ध: देशमुख साहेब भेटीदरम्यान कामगार संघातर्फे देशमुख साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन अधिकृत स्वागत करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील गोरगरीब, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांच्या रखडलेल्या मागण्या व समस्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. यावर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, गोरगरीब कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,असे जाहीर आश्वासन देशमुख साहेबांनी दिले. त्यांच्या या संवेदनशील आणि आश्वासक भूमिकेबद्दल बीड जिल्हा कामगार संघाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. जिल्हा कामगार संघाचे पदाधिकारी उपस्थित या महत्त्वपूर्ण बैठकीला बीड जिल्हा कामगार संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:  अध्यक्ष पठाण नवीद खान (बाबा खान)  उपाध्यक्ष इमरान इनामदार   सचिव तोफिक काजी कोषाध्यक्ष शेख सोहेल  उपसचिव शेख शाहेद यांच्यासह संघटनेचे सदस्य  इमरान शाह, शाहेबाज पटेल, सय्यद नवीद आदींची प्रमुख उपस्थिती होती. नव्या अधिकार्‍यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे बीड जिल्ह्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळेल, अशी आशा कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

COMMENTS