Homeताज्या बातम्या

नाभिक सेवा संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी तुषार दोडके यांची निवड

बीड : नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी नाभिक सेवा संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी तुषार दोडके यांची निवड करण्यात आली आह

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही : महापौर कविता मुळे
पालकमंत्र्यांच्या तथाकथित पंटरच्या कमिशनची चर्चाकामे मंजुरीसाठी 20 टक्क्यांपर्यंत कमिशन, अनेकांची छ. संभाजीनगर ची वारी
नांदेडमध्ये मटका साम्राज्यावर डीआयजी पथकाचा घणाघात; शहर पोलीस झोपेत होते का?13 आरोपी जेरबंद, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त; अवैध धंद्यांना राजकीय छत्रछाया असल्याची चर्चा


बीड : नाभिक समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी नाभिक सेवा संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी तुषार दोडके यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या विविध उपक्रमांना चालना मिळणार असून समाजातील युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
तुषार दोडके हे सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. या निवडीबद्दल समाजातील विविध मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुषार दोडके यांनी संघटनेच्या उद्दिष्टांना प्राधान्य देत समाजहिताचे उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

COMMENTS