पाथर्डी : मोहटादेवी मंदिराचा परिसर अधिक निसर्गरम्य व पर्यावरण पूरक बनवून हे ठिकाण निसर्ग पर्यावरण स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे मत

पाथर्डी : मोहटादेवी मंदिराचा परिसर अधिक निसर्गरम्य व पर्यावरण पूरक बनवून हे ठिकाण निसर्ग पर्यावरण स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे मत देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांनी व्यक्त केले. मोहटा देवी गडावर वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विश्वस्त विशाल शेंडे,वकील विक्रम वाडेकर,प्रसन्न दराडे,कल्याण बडे,शशिकांत दहिफळे,बाबासाहेब दहिफळे,अशोक दहिफळे,बाळासाहेब लाहोटी,शुभम दहिफळे,राजेंद्र शिंदें,मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,जनसंपर्क आधिकारी भीमराव खाडे,संदीप घुले,भूषण साखरे हे उपस्थित होते. जगताप म्हणाले की,या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांची लागवड केली जाणार आहे. या सर्व भागात विविध वृक्षाची व वेलींची लागवड केली जाणार आहे. लॅन्डस्केपिंग कायमस्वरूपी सुंदर राहण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. झाडांना गरजेनुसार पाणी दिले जाणार आहे.मोहटादेवी गड केवळ धार्मिक केंद्र न राहता एक निसर्ग पर्यटनस्थळ म्ह्णून सुद्धा ओळखले जावे असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS