लोणी : निळवंडे धरणाचे पाणी जिरायत भागात पोहोचल्याने शेतीला नवी संजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनवाढीबरोबरच विक्री तंत्रज्ञानही आत्मसात करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी केले.जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुप्रिया ढोकणे-पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम आणि पायरेन्सचे सचिव डॉ. निलेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या तेलबिया प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात विखे पाटील बोलत होत्या.यावेळी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विलास घुले, डॉ. विठ्ठल विखे, सज्जला लांडगे, डॉ.प्रियंका खर्डे, कैलास लोंढे यांच्यासह संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विखे पाटील म्हणाल्या, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियोजनातून भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यामुळे या भागाला दुष्काळ व पाणीटंचाईची झळ बसली नाही. आगामी काळातही शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्या पुढे म्हणाल्या, “उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी खरीप पिकांसह ऊस लागवडीकडेही लक्ष द्यावे. सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. उत्पादन वाढीसोबतच विक्री तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्यास शेतकरी अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण होईल.”देशाला खाद्यतेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी तेलबिया उत्पादन वाढविणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.प्रास्ताविकात प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख यांनी सांगितले की, भारत सरकारच्या तेलबिया प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत संगमनेर, राहाता आणि राहुरी तालुक्यातील पाच गावांतील १२५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ‘फुले द्रुवा’ सोयाबीन वाण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

COMMENTS