Homeताज्या बातम्या

शब्बीर जिवंत परतला..! ‘तो’ मृतदेह उकरून ओळख पटविण्याचा प्रयत्न

देवळाली प्रवरा : सोनगाव येथे मृत समजून दफन करण्यात आलेल्या व्यक्तीचा कथित मृत शब्बीर जमादार मन्सूरी जिवंत परत आल्याने निर्माण झालेल्या गूढ प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. प्रशासनाच्या उपस्थितीत दफन केलेला मृतदेह कबरीतून बाहेर काढून (एक्सह्युमेशन) त्याची खरी ओळख पटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.काही दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या शब्बीर मन्सूरी याचा शोध सुरू असतानाच परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक ओळखीनंतर तो मृतदेह शब्बीरचाच असल्याचे समजून कुटुंबीयांनी धार्मिक विधीनुसार दफनविधी केला होता. मात्र काही दिवसांनी शब्बीर जिवंत असल्याचे समोर आल्याने संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले.या पार्श्वभूमीवर आज महसूल, पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कबरीचे उत्खनन करण्यात आले. दफन केलेला मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात आली. मृतदेहाची स्थिती, उपलब्ध पुरावे तसेच वैज्ञानिक तपासाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची ओळख निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंचनाम्यावेळी अन्वर छोटूलाल मन्सूरी, सुफियान सिराज मन्सूरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल उगले, सचिन सोनवणे, नायब तहसीलदार बाचकर, डॉ. गणेश आडभाई, डॉ. मिसाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण घटनेमुळे मृतदेह ओळख प्रक्रियेतील पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, तपासाच्या अंतिम अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.”मग दफन झाला कोण?”शब्बीर जिवंत परतल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दफन करण्यात आलेला मृतदेह नेमका कुणाचा होता? मृतदेहाची ओळख पटविताना कोणती प्रक्रिया अवलंबली गेली होती? याबाबत आता तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जात आहे.तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष!सोनगावातील या अभूतपूर्व घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दफन झालेला मृतदेह नेमका कुणाचा होता, याचे उत्तर आता तपास अहवालातूनच समोर येणार असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाच्या अंतिम निष्कर्षाकडे लागले आहे.

महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन
सडे येथे घरगुती वादातून मारहाण; एकाचा मृत्यू
पारनेरमध्ये पाण्यात बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू  

COMMENTS