कोपरगाव शहर : काका कोयटे आणि सुधीर डागा यांची राज्यस्तरीय महत्त्वाच्या पदांवर झालेली निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण कोपरगावच

कोपरगाव शहर : काका कोयटे आणि सुधीर डागा यांची राज्यस्तरीय महत्त्वाच्या पदांवर झालेली निवड ही केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण कोपरगावच्या व्यापारी व सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्व, दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे कोपरगावचे नाव राज्यभर पोहोचले असून भविष्यातही व्यापारी, उद्योजक आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे सचिव प्रदीप साखरे यांनी व्यक्त केला.राज्यातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी, तसेच कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील समस्त व्यापारी व किराणा दुकानदारांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष अजित लोहाडे, खजिनदार तुलसीदास खुबानी, सचिव प्रदीप साखरे, महावीर सोनी, गुलशन होडे, किरण शिरोडे, आनंद लोढा, युवराज गांगवे, आशुतोष पटवर्धन, सुमित भट्टड, उल्हास गवारे, श्याम जंगम, पप्पूशेठ मुंदडा, प्रीतम बंब, यश विसपुते, नारायण लांडगे, धीरज कराचीवाला, हर्षल कृष्णानी, मानव शुक्ला, हर्षल जोशी यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, किराणा व्यावसायिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा गाव तिथे उद्योजक हा उपक्रम आणि कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचा मेक इन कोपरगाव हा उपक्रम कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने लवकरच हाती घेणार आहोत – ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ

COMMENTS