Homeताज्या बातम्या

देगलूर नगर परिषदेचे श्रमदानातून स्वच्छता अभियान; लोकसहभागाचे आवाहन

देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या संकल्पनेतून शहरात दर आठवड्याला एक दिवस श्रमदानाद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात य

नवीन पाणीपुरवठा टाकीच्या स्लॅबचे उद्घाटन
एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई
महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार- डॉ. रॅपनवाड



देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्या संकल्पनेतून शहरात दर आठवड्याला एक दिवस श्रमदानाद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी नगर परिषद प्रांगणात स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसरात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा श्रमदानातून हटविण्यात आला.
या अभियानात नगराध्यक्षा  विजयमाला  टेकाळे, नगरसेविका  उज्वलाताई  पदमवार, योगेश्वरी  तोटावार,  पल्लवी  ध्याडे, स्वच्छता समिती सभापती रत्नमाला  कौरवार, कलावतीबाई मोरे तसेच आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी आणि नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. विशेष म्हणजे नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे आणि मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी स्वतः फावडे व टोपली हातात घेऊन कचरा उचलत स्वच्छता केली. त्यांच्या या कृतीमुळे उपस्थित कर्मचारी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. समारोपप्रसंगी नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे यांनी देगलूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी दर आठवड्याला नियमितपणे श्रमदान मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. तर मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी स्वच्छता अभियान ही लोकचळवळ बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

COMMENTS