Homeताज्या बातम्या

लोकमंथन इफेक्ट: चहाच्या पाकिटावर आता उत्पादन दिनांकासह मुदतही स्पष्ट; श्रीगोंद्यातील बातमीचा मोठा परिणाम

श्रीगोंदा: शहरातील काही किराणा दुकानांमध्ये विक्रीस असलेल्या चहाच्या पाकिटांवर उत्पादन दिनांक, पॅकिंग तारीख व बॅच क्रमांक नमूद नसल्याबाबत "

नांदेडच्या नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकपदी निलभ रोहन; पदभार स्वीकारला
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा
बोर्डाच्या ढिसाळ मूल्यमापनाचा विद्यार्थ्यांना आर्थिक फटका; रिचेकिंग शुल्क परत करण्याची मागणी

श्रीगोंदा: शहरातील काही किराणा दुकानांमध्ये विक्रीस असलेल्या चहाच्या पाकिटांवर उत्पादन दिनांक, पॅकिंग तारीख व बॅच क्रमांक नमूद नसल्याबाबत “लोकमंथन”ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेत संबंधित विक्रेते व उत्पादकांनी चहाच्या पाकिटांवर आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेल्या काही चहाच्या पाकिटांवर उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक व कालबाह्यता मुदतीची माहिती नसल्याने ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित थेट मुद्दा असल्याने प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.

दरम्यान, लोकमंथनमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित उत्पादकांनी चहाच्या पाकिटांवर बॅच नंबर, पॅकिंग तारीख व मुदत संपण्याची तारीख यासह सर्व आवश्यक माहिती छापण्यास सुरुवात केली आहे. तसेच “पॅकिंगपासून १ वर्ष वापरण्यासाठी योग्य” असा स्पष्ट उल्लेखही आता करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची वैधता तपासणे अधिक सोपे झाले आहे.

ग्राहक संघटना व नागरिकांनी लोकमंथनच्या या यशस्वी पाठपुराव्याचे जोरदार स्वागत केले असून अन्नपदार्थांच्या विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी अशा प्रकारच्या जनहिताच्या बातम्या आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तथापि, श्रीगोंदा तालुक्यातील सर्व किराणा व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का, याची नियमित तपासणी अन्न व औषध प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून अद्यापही करण्यात येत आहे. ग्राहकांच्या हितासाठी केलेल्या वृत्तांकनाचा हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे.

COMMENTS