Homeताज्या बातम्या

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विनोद इंगोले पाटील यांची निवड

सामाजिक कार्याची दखल घेत समितीने सोपवली मोठी जबाबदारी; मराठवाड्यातून अभिनंदनाचा वर्षाव बीड । प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 1599 प्रकरणे निकाली
बीडच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख रमशा तस्कीन ’डी.वाय.पाटील’ मधून एमबीबीएस; बोरफडीकर परिवारातील पहिली डॉक्टर!
कौस्तुभ मातेकर 99.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति

सामाजिक कार्याची दखल घेत समितीने सोपवली मोठी जबाबदारी; मराठवाड्यातून अभिनंदनाचा वर्षाव

बीड । प्रतिनिधी : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, समितीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विनोद आप्पा इंगोले पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपबाबा पाटील खंडापूरकर यांच्या उपस्थितीत व आदेशानुसार सर्वानुमते ही निवड प्रक्रिया पार पडली.

विनोद इंगोले पाटील यांच्या सकारात्मक विचारशैली, संघटन कौशल्य, उत्तम नेतृत्व क्षमता आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी स्वाक्षरी केलेल्या नियुक्ती पत्राद्वारे त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या नवीन जबाबदारीनंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न आणि पारदर्शक प्रशासनासाठी समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

विनोद आप्पा इंगोले पाटील हे यापूर्वीपासूनच सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. समाजातील दुर्बळ घटक, महिला, विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा प्रसार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत समितीने त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून समाधान व्यक्त करण्यात येत असून विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार निर्मूलनाची चळवळ अधिक व्यापक आणि मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विनोद आप्पा इंगोले पाटील म्हणाले, “सत्य, पारदर्शकता आणि न्याय्य व्यवस्थेसाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करणार आहे. सामान्य नागरिकांच्या अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील.”

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, राष्ट्रीय सरचिटणीस अमोल भागवत, निवड समिती अध्यक्ष अनिल देसले, महिला प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. राणीताई स्वामी, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी इंगोले, राणा चव्हाण (अंबेजोगाई), महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड पाटील, युवा अध्यक्ष समीक्षा वाघमारे, रूपाली देशपांडे, प्रकाश अण्णा काळे, शिवाजीराव हिंदोळे, प्राजक्ता अभिमान डोंगरे, स्वाती शिरसाट, परमेश्वर कवचट, सना रफिक शेख, शशिकला हनुवसे, सौ. मीरा खांडे, दीपक सोळुंके, गणीभाई मुलानी, भारती दूरधरे, लक्ष्मण कसबे, विशाल पोटभरे (लातूर), रवींद्र जोगदंड, प्रा. दत्ता काळे, बाळासाहेब देवगुडे, मिनीनाथ गाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनोद इंगोले पाटील यांच्या निवडीमुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कामाला नवीन दिशा मिळणार असून, भ्रष्टाचाराविरोधातील सामाजिक लढा अधिक तीव्र होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS