देवळाली प्रवरा : येथील प्रसिद्ध संपादक व पत्रकार आशिष संसारे यांना 'आधार फाउंडेशन' आणि 'एस. आर. २४ न्यूज' यांच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय उत्कृष

देवळाली प्रवरा : येथील प्रसिद्ध संपादक व पत्रकार आशिष संसारे यांना ‘आधार फाउंडेशन’ आणि ‘एस. आर. २४ न्यूज’ यांच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
हा भव्य पुरस्कार सोहळा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक नवा मराठाचे संपादक तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुंदेचा हे होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार आशिष संसारे यांना सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला साई आदर्श संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, ह.भ.प. राधिका खेमनर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हा. चेअरमन रामदास बाचकर, शिवसेना नेते रावसाहेब खेवरे, आणि शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात पत्रकारितेसोबतच आरोग्य, अध्यात्म, कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशन व एस. आर. २४ न्यूजचे मुख्य संपादक रमेश खेमनर आणि अध्यक्षा ह.भ.प. राधिकाताई खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. आशिष संसारे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण, राजकीय आणि सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS