Homeव्हिडीओ

बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत होणार असून महाराष्ट्र बनणार ग्लोबल सप्लाय चेनचे मुख्य केंद्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा!

https://youtu.be/C-Eo6rc_Uaw मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

हिंदू खाटीक समाजातील उमेदवारांना आवाहन
जीडीपी 6.9 तर किरकोळ महागाई 4.6 टक्के राहण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेचा अंदाज
प्रगत इंटरकनेक्टिव्हिटी शासनासाठी उपयुक्त ठरणार : मुख्यमंत्री फडणवीस; इक्विनिक्स एमबी 3 डेटा सेंटरचे उद्घाटन

मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे आता या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणे हे एकात्मिक आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील जबिल कंपनीच्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना समृद्धी महामार्गालगत स्वतंत्र मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरद्वारे जोडण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. हा कॉरिडॉर जालना, वर्धा येथील ड्राय पोर्ट आणि पुढे गडचिरोलीपर्यंत जोडला जाणार असून यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च ७ ते ८ टक्क्यांनी कमी होणार आहे. सध्या भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात विकसित होत असून, इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्येही राज्याने अग्रस्थान मिळवले आहे. देशाच्या एकूण उत्पादनात आणि निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील उद्योगांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यास शासन कटिबद्ध असून रांजणगाव औद्योगिक पट्ट्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही महाराष्ट्राच्या जलद निर्णय प्रक्रियेचे कौतुक करत देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग १३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले.

COMMENTS