नेकनूर : नेकनूर गावाच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक असून, अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळे तालुका माग

नेकनूर : नेकनूर गावाच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी तालुक्याचा दर्जा मिळणे अत्यंत आवश्यक असून, अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीमुळे तालुका मागणीच्या ४५ वर्षांच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच नेकनूरला तालुक्याचा दर्जा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सन १९८० पासून नेकनूर गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी गावकरी, परिसरातील नेते आणि नागरिक सातत्याने प्रयत्न करत आहेत. या मागणीसाठी विविध आंदोलने करण्यात आली. यामध्ये रस्ता रोको आंदोलन, बाजार बंद, बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, उपोषण, तत्कालीन आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मोर्चा तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि पालकमंत्र्यांना निवेदने देण्यात आली. परिसरातील जवळपास ७० गावांचे ठरावही शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. तालुका कृती समिती आणि ग्रामस्थ मागील ४५ वर्षांपासून या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
या लढ्यात अनेकांनी मोठे योगदान दिले असून, काही कार्यकर्ते आज हयात नाहीत. त्यांच्या योगदानाची आठवण ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. या चळवळीत स्व. बबनराव शिंदे, स्व. पांडुरंग आबा मोरे, स्व. रामचंद्रकाका शिंदे, स्व. खाजापाशा साहेब, स्व. खमरपाशा साहेब, स्व. सय्यद तक्कियोद्दीन साहेब, स्व. सय्यद मोहम्मद साहेब, स्व. सय्यद आलेमभाई, स्व. सुरेशराव पाटील, स्व. शेख सिद्दिकीभाई, स्व. लक्ष्मण निर्मळ, स्व. शेख परविज काझी, स्व. मिलिंद निर्मळ, स्व. दयानंद निर्मळ, स्व. ऋषिकेश चव्हाण, स्व. सुदाम अविळे, स्व. गिरीदेवा मुळे आदींचे योगदान महत्त्वाचे ठरले.
आजही मोहनराव शिंदे, सुधाकर कल्याणकर, नारायणराव शिंदे, जफर काझी, रशीद तांबोळी, अॅड. जगदीशराव शिंदे, कल्याणराव शिंदे, नामदेव काळे, शेख परविज, अनिस जहागिरदार, मच्छिंद्र येडे, रमेश उंडाळे, रशीद मामू (पत्रकार), अण्णासाहेब शिंदे, पांडुरंग होमकर, दादाराव काळे, सय्यद साजेदली, बापूराव सावंत, आबेद कुरेशी, सय्यद मोहिबभाई, लिंबराज ढोरमारे, भिकाजी काशीद, विजय इंगळे, आझम पाशा, सय्यद सोहिब (आमदार), जगन्नाथ नन्नवरे, बालुकाका शिंदे, रत्नाकर सर्वज्ञ, अभिमानराव शिंदे, किशोर कांकर, दिगांबर लांडगे, लालु जहागिरदार, सय्यद सलीम पाशा, सय्यद हमीदभाई आदी कार्यकर्ते या मागणीसाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामस्थांची मूळ मागणी आजही तालुक्याचीच असून, काहीजण राजकीय कारणातून नगरपंचायतीची मागणी करत आहेत. मात्र गावाचा सर्वांगीण विकास तालुका झाल्यानंतर अधिक वेगाने होतो आणि त्यानंतर नगरपंचायतीचा दर्जाही मिळू शकतो, असे तालुका कृती समितीने स्पष्ट केले आहे.
- संजय ज्ञानोबा शिंदे : “तालुका मागणीतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यामुळे महसूल विभागाची कामे स्थानिक ठिकाणी होणार असून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.”
- सय्यद मोईबभाई : “पूर्वी सर्वजण एकत्र बसून निर्णय घेत असत आणि कामे मार्गी लावत असत. त्याच पद्धतीने एकजुटीने तालुक्याची मागणी लावून धरली तर निश्चित यश मिळेल.”
- अॅड. जगदीशराव शिंदे : “९० च्या दशकात आंदोलन करताना गावकऱ्यांचा मोठा सहभाग होता. कृती समितीने मंत्रालयापर्यंत निवेदने देऊन पाठपुरावा केला. आज त्याचे एक फळ दिसत असल्याचा आनंद आहे. नेकनूरला तालुक्याचा दर्जा मिळावा हीच इच्छा आहे.”
- विजयकुमार इंगळे : “आंदोलनाच्या काळात आर्थिक अडचणी होत्या. उसने पैसे घेऊन बीड, औरंगाबाद आणि मुंबई येथे जावे लागले. अनेक वेळा उपाशीपोटी राहावे लागले, पण मागणीसाठी संघर्ष सुरू ठेवला.”
- नामदेवराव काळे : “आंदोलन केल्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्याच्या तारखा अनेक वर्षे चालल्या. गावकऱ्यांच्या खडतर प्रयत्नातून अप्पर तहसील मंजूर होत आहे, याचा मनापासून आनंद आहे.”

COMMENTS