अकोले : पावसाने दडी मारल्याने अकोले तालुक्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली असून, उपलब्ध पाणीसाठा जपण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने उपाययोजना स

अकोले : पावसाने दडी मारल्याने अकोले तालुक्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली असून, उपलब्ध पाणीसाठा जपण्यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. धरणे, बंधारे व तलावांमधील पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी पिण्याच्या पाणीपुरवठा योजना वगळता इतर सर्व उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, तसेच बेकायदेशीर पाणीउपसा रोखणे आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासंदर्भात अंबित, बलठण, कोथळे, शिरपुंजे-देवहांडी, घोटी-शिळवंडी, पिंपळगाव खांड, बोरी तसेच बेलापूर-बडगी येथील लघुपाटबंधारे तलावांमधील पाणीसाठा संरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पांवरील पिण्याच्या पाणीपुरवठा योजना वगळून इतर सर्व उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा बंद करण्याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (महावितरण) पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
अकोले पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता यो. बा. जोर्वेकर यांनी तहसीलदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय वेळेत राबविला गेला नाही, तर उपलब्ध पाणीसाठ्यावर अतिरिक्त ताण येऊन भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची चिंता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
‘या’ तलावांमधील पाणीसाठा संरक्षित अंबित, बलठण, कोथळे, शिरपुंजे-देवहांडी, घोटी-शिळवंडी, पिंपळगाव खांड, बोरी तसेच बेलापूर-बडगी येथील लघुपाटबंधारे तलावांमधील पाणीसाठा संरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS